breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिका मुकादमाच्या घरी 36 लाख रुपयांचं सापडलं घबाड

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

फुटपाथवरच्या नारळ विक्रेत्याकडून पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिकेच्या मुकादमाच्या घरी सुमारे 36 लाख रुपयांचं घबाड सापडल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने येरवडा भागातील एका नारळ विक्रेत्याकडे पाचशे रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या मुरादमाच्या घरी शनिवारी छापा टाकला. या करवाईत एसीबीने पालिकेचा मुकादम सुनील शर्मा आणि मदतनीस गोपी उबाळे या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत एसीबीच्या तपास पथकाला तब्बल 36 लाख रूपयांची रोकड आणि आठ तोळे सोन्याचे दागिने सापडले आहेत. मुकादमाच्या घरी एवढी मोठी रक्कम पाहून एसीबीचे अधिकारीही थक्क झाले. शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरू होती. पथकातील अधिकारी नोटा मोजत बसले होते.

मिळालेली माहिती अशी की, सुनील शर्मा हा पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मुकादम पदावर कार्यरत आहे. तर उबाळे हा त्याची बिगारी कामे करतो. नारळाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी मुकादमाने पाचशे रुपयांची लाच घेतली होती. एसीबीने या प्रकरणी दखल घेऊन शर्मा याच्या लोहगाव येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने आढळून आले. पाचशे रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुकादमाकडे मोठी रोकड मिळेल, असा अंदाज एसीबीच्या तपासपथकालाही नव्हता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button