breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अशी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेसाठी बसविलेली गुहा!

केदारनाथ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदरानाथचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली. त्यानंतर तेथील एका गुहेत सुमारे 17 तास ते ध्यानधारणेसाठी बसले होते. त्यानंतर या गुहेबाबतची उत्सुकता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानाला बसलेली गुहा नेमकी कशी आहे, याबाबत चर्चा सुरू आहेत. या गुहेत शौचालयापासून ते सीसीटीव्हीपर्यंतच्या सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. या गुहेला ‘रुद्र गुफा’ असे नाव देण्यात आले असून ती पहाडी पद्धतीने दगडांपासून बनवण्यात आली आहे. या गुहेत एका चांगल्या दर्जाची खोली असून त्याला अटॅच टॉयलेट आहे. तसेच या खोलीत एक बेडही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बेडवर बसून किंवा जमीनीवर ध्यानधारणा करता येते.

समुद्र सपाटीपासून 12 हजार किलोमीटरच्या उंचीवर असलेल्या या ठिकाणी असलेल्या या गुहेत सर्व अद्ययावत सुविधा आहेत. या गुहेची उंची 10 फूट असल्याने आतमध्ये गुदमरायला होत नाही. तसेच गुहेला एक खिडकी असल्याने हवा खेळती राहते आणि त्या खिडकीतून केदारनाथाचे दर्शन रता येते. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या गुहेतील सर्व सोयी सुविधांची विश, काळजी घेण्यात आली होती. पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांसह सीसीटीव्ही पर्यंतच्या अद्यायावत सुविधा गुहेत आहेत. गेल्या वर्षी या गुहेचे काम पूर्ण करण्यात आले. बांधण्यात आल्याासून गुहा बंद ठेवण्यात आली होती.

आता भाविकांना वापरण्यासाठी ती खुली करण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांना नोंदणी करावी लागणार आहे. एक भाविक जास्तीतजास्त तीन दिवसांसाठी नोंदणी करू शकतो. परिसरात अशा पाच गुहा उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या गुहेत ध्यानधारणा केल्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे अशा रमणीय आणि भक्तीमय वातावरणात ध्यानधारणा करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता केदारनाथ मंदिराच्या पुजाऱ्याने वर्तवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button