breaking-newsपिंपरी / चिंचवड

पुणे महानगरपालिकेतर्फे सामर्थ्य प्रबोधिनी संस्थेस केले सन्मानित

पुणे |महाईन्यूज|

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेतर्फे सामाजिक कार्यात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सामर्थ्य प्रबोधिनी संस्थेस सन्मानित करण्यात आले. महापाैर मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते संस्थेचे अध्यक्ष सुशांत भिसे यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपरी चिंचवडमधील सामर्थ्य प्रबोधिनी संस्थेच्या शिरपेचात दोन मानाचे तुरे रोवले गेले. प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकाद्वारे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित केले जाते. संस्था विभागात सामर्थ्य प्रबोधिनी संस्थेला महापौर मुरलीधर मोहोळ यांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष सुशांत भिसे यांना त्यांच्या सामजिक क्षेत्रात अग्रेसर म्हणून व्यक्तीगत पुरस्काराने सन्मानित केले.

यावेळी उपमहापौर सरस्वतीताई शेडगे, सत्तारुढ पक्षनेते धीरज घाटे, स्थायी समिती सभापती हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते. सामर्थ्य प्रबिधिनीचे अध्यक्ष सुशांत भिसे म्हणाले की, या पुरस्काराने जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढील काळात संस्था अनेक समाजोपोगी उपक्रम राबवून आमचे समाजकार्य अविरतपणे सुरु राहील. असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button