breaking-news

पुणे मनपा भवन ते खुळेवाडी बससेवा पुन्हा सुरू ; नागरिकासह विद्यार्थ्यांची सोय

पुणे –  पुणे महानगर पालिका ते खुळेवाडी या मार्गावरील बस बंद केल्यानंतर नगरसेवकांनी महानगर पालिकेत केलेल्या आंदोलनानंतर ही बस पुन्हा सुरू करण्यात आली असून प्रवाशांनी बसचे स्वागत केले.
पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर पालिका ते खुळेवाडी या मार्गावरील बस बंद केली होती. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत होते. प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेवक भैय्या जाधव, नगरसेविका संजिलाताई पठारे, सुमनताई पटारे यांनी बस पुन्हा सुरू होण्यासाठी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये आंदोलन केले होते. शिवाय, पाठपुरावाही केला होता. यानंतर या मार्गावरील 236/1 ही बस पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
नगरसेवक पठारे, जाधव, सुमनताई पठारे, विधान सभा उपाध्यक्ष (वडगाव शेरी) सोमनाथ भाऊ साबळे, शेलार मामा, तसेच न ता वाडी डेपो शिवाजी नगर चे चालक विलास शंकर धुमाळ व वाहक अरुण दामसे, विद्यार्थी व प्रवासी यावेळी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button