breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुणे : भाजपचा प्रचाराचा नारळ आज फुटणार
पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी
भाजपचा पुण्यातील प्रचाराचा नारळ आज सोमवारी दुपारी साडेचार वाजता फुटणार आहे. गणेश कला क्रिडा केंद्र येथे भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रीय सरचिटणीस व्ही. सतीश, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असणार आहेत.
गंगाधाम रस्ता, वर्धमान पुरम येथील जैन धर्मगुरू शिवमुनी यांची भेट घेऊन नड्डा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत सायंकाळी साडेसातनंतर पुण्यातील एका खासगी हॉटेलात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी नड्डा संवाद साधणार आहेत.