breaking-newsराष्ट्रिय
बीएसएफच्या ३६ जवानांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : बीएसएफ जवानांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या २४ तासांत सीमा सुरक्षा दलाच्या ३६ जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर ३३ जवान बरे झाले आहेत. सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, सध्या बीएसएफमध्ये ५२६ जवानांवर उपचार सुरु आहेत तर ८१७ जवान बरे झाले आहेत.