breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाडमधील कोसळलेल्या इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे : सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

रायगड । प्रतिनिधी

महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप 19 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर आतापर्यंत 60 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान या प्रकरणी जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाडमध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. अजूनही आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे याप्रकरणी जो कोणी दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button