breaking-newsमनोरंजन

अलका कुबल यांच्या लेकीचा रोका सोहळा पार…पहा फोटो…

‘माहेरची साडी’ या चित्रपटातून प्रत्येक व्यक्तीच्या मनाला भावूक करणारी आणि भावणारी व्यक्तीरेखा म्हणजे अभिनेत्री अलका कुबल- आठल्ये. माहेरची साडी या चित्रपटामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. कायम सुनेची आणि आईची भुमिका साकारणा-या अलका कुबल आता लवकरच सासूबाई होणार आहेत. त्यांच्या लेकीचा इशानीचा नुकताच रोका समारंभ पार पडला आले. अलका यांनी इन्स्टाग्रामवर या रोका सेरेमनीमधील काही फोटो शेअर केले आहेत.

अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन मुलगी आहेत. या पैकी त्यांची थोरली लेक इशानी लवकरच दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यापूर्वी या दोघांचा रोका समारंभ झाला. अलका कुबल यांनी शेअर केलेल्या फोटो मध्ये एका फोटोत अलका कुबल आपल्या लेकीच्या रोका समारंभात धम्माल डान्स करताना दिसतायत.

इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे इशानी ज्या निशांतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तो मुळचा दिल्लीचा असून तोदेखील मियामीमध्येच स्थायिक आहे. अद्याप केवळ यांचा रोका पार पडला आहे. मात्र ही जोडी लग्नगाठ कधी बांधणार हे स्पष्ट झालेलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button