breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक : जयंत पाटील म्हणतात… अरुण लाड आमचा ‘हुकमी एक्का’

सांगली । प्रतिनिधी

विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास पक्षाच्यावतीने जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीने (NCP) पुणे पदवीधर मतदारसंघात (Graduate Constituency Election 2020) अरुण अण्णा लाड (Arun Anna Lad) तर औरंगाबादमधून सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या जागांवरच्या उमेदवारांची घोषणा करतावेळीच लाड आणि चव्हाण यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली. (jayant patil tweet on Arun Lad And Satish Chavan over Graduate Constituency Election 2020)

महाविकास आघाडीने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला आम्ही पात्र राहू. येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असा निर्धार अरुण लाड आणि सतिश चव्हाण यांनी बोलून दाखवला आहे.

अरुण अण्णा लाड यांचा थोडक्यात परिचय

राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड यांना पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तसंच स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांचे पुत्र आहेत.

सतिश चव्हाण यांचा थोडक्यात परिचय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून सतिश चव्हाण यांची ओळख आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचंच ते प्रतिनिधित्व करतात. शैक्षणिक प्रश्नांवर सतिश चव्हाण यांचं काम चांगलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button