breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुणे ते शिर्डी हेलिकाॅप्टरने प्रवास आता 40 मिनिटात!
पुणे |महाईन्यूज|
पुण्यावरून शिर्डी प्रवास आता फक्त 40 मिनिटांमध्ये शक्य झाला आहे. ब्लेड या कंपनीने पुण्यातून शिर्डीसाठी सुरू केलेल्या हेलिकॉप्टर सर्व्हिसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
पुण्यावरून अवघ्या चाळीस मिनिटांत शिर्डीमध्ये साईबाबा यांचे दर्शन घेऊन थोड्या वेळातच पुण्यातही पोहोचू शकतो. ब्लेडने पुणे-मुंबई, पुणे-शिर्डी आणि शिर्डी-मुंबई मार्गावर प्रवाशांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. सुमारे पंधरा ते सोळा हजार रुपये दरात प्रवासी हा प्रवास करु शकतात. पुण्यातील गरुड दांपत्याला त्यांच्या मुलीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पुणे- शिर्डी ट्रिप स्पॉन्सर केली आहे. तर कॅप्टन नितीन वेलडे यांच्यामुळे हा प्रवास सुखकर झाला.