breaking-newsपिंपरी / चिंचवड

पुणे जिल्ह्यातील दारू विक्री करणारी दुकाने बंद करा, गोविंद पानसरे यांची मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनामुळे राज्यात मृतांची संख्या वाढत आहे. मुंबई व पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2500 पर्यंत गेली आहे. ही खूप चिंताजनक बाब आहे असे असताना पुण्यामध्ये दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ  पिंपरी चिंचवडचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे आणि माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

पुण्यातील बहुतांश ठिकाणी दारू घेण्यासाठी नागरिकांनी रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत. यामुळे सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा उडाला आहे. नागरिकांकडून कलम 144 चे उल्लंघन होत आहे. यामुळे कोरोना सारख्या साथीचा प्रादुर्भाव वाढू शकतो व परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ शकते. दारू पिल्यामुळे घरामध्ये महिलांवर अत्याचार होण्याची प्रकरणेही वाढू शकतात. पोलीस यंत्रणेवर खूप ताण आहे, पोलिस यंत्रणेला पासेस, सोशल डिस्टन्ससिंग, वाहतूक व्यवस्था, विविध प्रकारच्या परवानग्या याच्यामध्ये आपला वेळ खूप द्यावा लागतो. पोलीस यंत्रणेकडे मनुष्यबळही अपुरे आहे. आज आपण जर पाहिले तर शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात ही कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा आरोग्य यंत्रणेवर ही ताण पडत आहे, असेही पानसरे आणि बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 

पुणे जिल्ह्यातील दारू विक्री बंद करण्याचे आदेश द्यावेत. जेणेकरून कोरोना सारख्या साथीचा प्रादुर्भाव वाढण्यास आळा बसेल. महिलांवर होणारे अत्याचाराची प्रकरणे होणार नाहीत. पोलिस प्रशासनाचा ही तान कमी होईल. एक  प्रकारे गुन्हेगारी वाढण्यास आळा बसेल. जास्तीत जास्त नागरिकांची कोरोना टेस्ट करून घ्यावी, दिवसाची टेस्ट करण्याची संख्या वाढवावी, आरोग्य रुग्णालयांना जास्तीत-जास्त टेस्ट किट पुरवाव्यात म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. योग्य वेळी त्याला आळा बसेल, असेही पानसरे आणि बाबर यांनी सुचविले आहे.

कोरोना प्रादुर्भावास आळा बसण्यास व महिलांवरील अत्याचार होऊ नये यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये  तात्काळ दारू विक्री करणारी दुकाने बंद करावीत. अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी चिंचवडच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button