breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू, शिंदे गटातील आणखी एका खासदाराचा राजीनामा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू आहे. दरम्यान, शिंदे गटातील हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटाच्या दोन खासदारांनी राजीनामे दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

खासदार हेमंत गोडसे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाची मागणी आहे की, त्यांना आरक्षण मिळावं. यासाठी अनेकदा लाखोंच्या संख्येनं मोर्चेदेखील निघाले. आजही सर्व मराठी समाजाच्या युवकांच्या भावना आहेत की, आम्हाला आरक्षण मिळालं तर खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळेल. काही वर्षांपूर्वीचा मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही, असा अहवाल असला तरी आज पुन्हा सर्वेक्षण केलं तर मला विश्वास आहे, मराठा समाज मागासलेला आहे, हे निष्पन्न होईल.

हेही वाचा – Pimpri-Chinchwad : मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर जाळले टायर

या अगोदर मराठा समाजाच्या शेतकरी वर्गाकडे शेकडो एकर जमिनी होत्या. आज बघितलं तर कुणाकडे एक एकर तर कुणाकडे दोन एकर जमीन आहे. राज्यात अल्प भूदारक शेतकरी अधिकाधिक वाढत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर मुलांना नोकरीसाठी आटापिटा करावा लागत आहे. शिक्षणासाठीही पैसे द्यावे लागतात. मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत म्हणून मी एक लोकसभा सदस्य म्हणून आणि आपली जबाबदारी म्हणून मी राजीनामा देत आहे, असंही हेमंत गोडसे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button