breaking-newsपुणे

पुणे जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी विदेशी कंपनीने घेतला पुढाकार

पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड व पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषानुणे थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. मात्र, चाकण येथील एअर लिक्विड हा फ्रान्सच्या कंपनीचा प्लांट ऑक्टोबरअखेर सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्यात आता ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून यापुढे कधीही तुटवडा भासणार नाही.

चाकण येथील एअर लिक्विड हा फ्रान्सच्या कंपनीचा प्लांट याच महिन्यात सुरू होत आहे. 118 मॅट्रिक टन क्षमतेची या प्लांटची उत्पादन क्षमता असणार आहे. त्यामुळे पुढील काळात पुणे, पिंपरी चिंचवड व पुण्याच्या ग्रामीण भागात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात कोरोना आढावा बैठीत ते उपस्थित होते. तेव्हा बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या सोबत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा उपक्रम 40 लाख लोकांपर्यंत पोहोचल्याच डॉ. देशमुख यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button