breaking-newsक्रिडापुणे
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपियाचा सोलोमन विजेता
महाईन्यूज | पुणे
३४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा देखील परदेशी खेळाडूचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. पुरुष गटात इथिओपियाचा सोलोमन हा विजेता ठरला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्पर्धेचे आयोजक माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विजेत्यांचा विशेष गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे ५ वाजता कै. बाबुराव सणस मैदानापासून ढोल ताशाच्या गजरात दणदणीत सुरुवात झाली.