breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु होणार; विजय वडेट्टीवारांचं ट्वीट

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन बंद आहे. सध्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसह इतर काही लोकांनाच मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच लोकल लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्वच स्तरांमधून केली जात आहे. आता सर्वांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेण्यात येईल, असं ट्वीट मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवारांनी ट्वीट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button