breaking-newsपिंपरी / चिंचवड

पीएमपी अधिका-यांचा मनमानी कारभार , शहरातील विविध मार्गावरील बस सेवा बंद

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) पिंपरी-चिंचवडच्या वेगवेगळ्या पाच मार्गावरील बस बंद केल्या आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या त्याचे पडसाद उमटले. तसेच पीएमपी अधिका-याच्या मनमानी कारभाराबद्दल स्थायी सदस्यांनी संताप व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.  स्थायी समितीच्या विषय पत्रिकेवर पीएमपीएमला संचलन तुटीपोटी तीन महिन्याची आगाऊ रक्कम 22 कोटी 50 लाख रुपये देण्यात आला. या प्रस्तावाला आयत्यावेळी मान्यता दिली. पीएमपीएमलच्या अधिका-यांनी स्थायी समितीची सभेला उपस्थित रहावे. सदस्यांच्या तक्रारींचे निराकरण करावे. अन्यथा संचलन तुट थांबविण्यात येईल, अशा उपसूचनेसह विषय मंजूर केला आहे.

अमित गावडे म्हणाले, शहरातील पाच मार्गावरील पीएमपीने बस अचानक बंद केल्या आहेत. याबाबत कोणतीही पूर्वकल्पना पिंपरी-चिंचवड पालिकेला दिलेली नाही. याबाबत विचारणा केली असता तोट्यातील मार्ग असल्यामुळे कारण दिले जाते. निगडी ते किवळे आणि किवळे ते निगडी या दोन कोणतीही पुर्वकल्पना न देता बंद केल्या आहेत.यामुळे नागरिकांना त्रास होत असून त्याचा पीएमपीएलने कोणताही विचार केला नाही.

विलास मडेगिरी म्हणाले, गेल्या 15 दिवसांपासून पीएमपीएल प्रशासनाला पीएमपीएल अध्यक्ष यांच्याबरोबर पिंपरी-चिंचवड हद्दीतील प्रश्नाबाबत बैठक घेण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र याला उत्तर घेण्याची तसदी देखील अद्याप घेण्यात आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button