ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलीने दिला बाळाला जन्म

पिंपरी चिंचवड | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार 7 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2021 या कालावधीत पिंपरी येथे घडला. त्यामुळे गरोदर राहिलेल्या मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे.गुरु उर्फ सचिन सिद्धाराम गायकवाड (वय 19, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे असून याप्रकरणी पीडित मुलीने बुधवारी (दि. 22) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सन 2019 मध्ये बकरी ईदच्या दिवशी त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या मैदानात गेल्या होत्या. त्यावेळी तिथे त्यांची आरोपी सोबत ओळख झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वेळा तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केला. त्यानंतर फिर्यादी मुलगी गरोदर राहिली आणि तिने 22 सप्टेंबर रोजी एका बाळाला जन्म दिला. मात्र याप्रकरणी संबंधीत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस याबाबत आणखी तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button