breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: गोवा कसं झालं करोनामुक्त? मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणतात…
१९ एप्रिल रोजी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा हे राज्य करोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. गोव्यात करोनाचे सात रुग्ण सापडले होते. त्यानंतर हे सातही रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान गोवा कसं करोनामुक्त झालं याची माहिती खुद्द प्रमोद सावंत यांनी दिली आहे. “३ एप्रिलनंतर गोव्यात एकही करोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला नाही. राज्यातील वैद्यकीय टीमनं उत्तम काम केलं आहे. तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनीही मोलाची भूमिका साकारली. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच गोवा करोनामुक्त झालं,” असं मत सावंत यांनी व्यक्त केलं.