breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बेस्ट लक ; बारावीची परिक्षा उद्यापासून सुरु होणार

पुणे  : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा उद्यापासून (ता.21) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धातास म्हणजे साडेदहाच्या पूर्वी आणि दुपारच्या सत्रात अडीच पूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहायचे आहे.

परीक्षेसाठी नऊ भाषा विषयांच्या कृतीपत्रिका तयार करण्यात आल्या असून, भौतिक, जीव, रसायनशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचा ताण येऊ नये म्हणनू या परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या विषयांमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रक अधिकृत म्हणून ग्राह्य धरावे. खासगी संस्था वा व्यक्तींनी दिलेल्या वेळापत्रकांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केले आहे. या परीक्षेवेळी कोणताही विद्यार्थी वा पर्यवेक्षक यांना परीक्षा केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सुचना 
– परीक्षेसाठी निळा आणि काळा शाईच्या पेन वापरण्यास परवानगी आहे.
– परीक्षा केंद्रात मोबाइल अथवा इलेक्‍ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई आहे.
– पेपरची अदलाबदल होऊ नये म्हणून उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर बारकोड
– संवेदनशील परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक असेल, चित्रीकरणही होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button