breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus | गळ्यावर ब्लेडने वार करुन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची आत्महत्या

अकोला | अकोल्यात कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याने पहाटे स्वतःचा गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गळा ब्लेडने चिरून स्वतःला गंभीर जखमी केलं होतं. कोरोना बाधित रुग्णाच्या आत्महत्येने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे. आसामच्या सालपाडा येथील ३० वर्षीय कोरोना पोझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याची बाब सकाळी उघडकीस आली. 

हा रुग्ण ७ एप्रिलला उपचारासाठी दाखल झाला होता. अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णवार उपचार सुरू होता. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णची प्रकृती देखील स्थिर होती. जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात या रुग्णवर उपचार सुरू होता. रुग्णाने स्वतःचा गळा ब्लेडने चिरून आत्महत्या केली. या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल दोन दिवसाधी आला होता आणि त्याप्रमाणे त्यावर उपचार ही सुरू होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button