breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी विधानसभा निवडणूक; शेखर ओव्हाळ याचं ‘फिक्स ठरलं’….’आता माघार नाही’

राष्ट्रवादीचे पक्षसंघटन वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न
–  ‘वन बूथ-टेन युथ’ युवकांची स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी 
विकास शिंदे
पिंपरी, ( महा ई न्यूज ) – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे इच्छुक उमेदवार शेखर ओव्हाळ यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ‘वन बूथ-टेन युथ’ मोहीम स्वतंत्रपणे राबवून पक्षसंघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला तगडे आव्हान निर्माण करण्याची तयारी सुरु केली आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसची ताकद प्रचंड असल्याने बालेकिल्ला म्हणून ओळख जात होता. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचा पहिला आमदार निवडून आला होता. तसेच महानगरपालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत पिंपरीतून सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. मात्र, पक्षातंर्गत मतभेद, पदाधिका-यांचे गट-तट आणि एकमेकांच्या पाय ओढण्याच्या रस्सीखेचात 2014 मधील पिंपरी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ताब्यात घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काही प्रमाणात उतरती कळा लागली. पक्षाच्या काही नेत्यांनी आपआपले प्रभाग देखील ताब्यात ठेवण्यास अपयश आले. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंगेसला पुन्हा बालेकिल्ला म्हणून या पिंपरी विधानसभा मतदारसंघ बनविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मक बांधणी, बूथ कमिट्यांच्या नियुक्ती, राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, युवक कार्यकर्ते यांना सर्वांना विश्वासात घेवून पिंपरी विधानसभा निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येवू लागला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसची ‘वन बूथ-टेन युथ’ मोहीम राबवून पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरु आहे.  तसेच माजी नगरसवेक शेखर ओव्हाळ यांनी गोरगरीब, गरजू घटकांतील लोकांना सतत मदतीचा हात दिला आहे. त्याचा सुख-दुखात सहभागी होवून चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यांनी तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करुन मतदारसंघात दांडगा जनसंपर्क सुरु ठेवला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात तरुणांना आणि नवीन चेह-यांना संधी देण्याचे सूचक विधान केले आहे.  त्यामुळे शेखर ओव्हाळ यांनी पिंपरी विधानसभेसाठी गाठी-भेटीचा सपाटा लावला आहे. मतदारसंघात फेरफटका मारुन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादीच्या शाखा निर्माण करण्याचा विचार त्याचा आहे. मतदारसंघात जनहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा विचार असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा गराडा त्याचा अवती भोवती तयार होवू लागला आहे. त्यामुळे गोरगरीब, कष्टकरी, कामगार, मजूरांसह अठरापगड जाती धर्मातील लोकांची मने जिंकण्यास त्यांना यश मिळत आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button