breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सांगोला पोलिसांच्या हातावर तुरी देवून तडीपार आरोपीचे पलायन

सांगोला |महाईन्यूज|

सोलापूर जिल्ह्यातून 1 वर्षाकरिता हद्दपार केले असताना विनापरवाना सांगोला शहरात प्रवेश केलेल्या तडीपार आरोपीस पोलिस कर्मचारी ताब्यात घेण्यासाठी गेले असता पोलिसांना त्याने धक्काबुक्की करून पळून गेल्याची घटना घडली.

तडीपार विजय बबन केदार (रा. वासुद, ता. सांगोला) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6 मार्च) दुपारी 1.30 च्या सुमारास पंढरपूर रोडवरील फॅबटेक कॉलेजनजीक घडली.

वासुद (ता. सांगोला) येथील विजय बबन केदार यास उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढा यांच्या कार्यालयाकडून 1 वर्षाकरिता सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. तरीही तो विनापरवाना हद्दपार क्षेत्रात मुक्त संचार करत आहे. याबाबत पो.नि. राजेश गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गवळी यांनी अर्जुन मुळे, सिद्धनाथ शिंदे, सचिन देशमुख, संभाजी भोसले यांना बबन केदार हा फॅबटेक कॉलेजवर आल्याची माहिती सांगून त्यास ताब्यात घ्या, असे आदेश दिले होते.

पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की करून तो सांगोल्याच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो सापडला नाही. याबाबत सरकारतर्फे पो. कॉ. सिध्दनाथ अर्जुन शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button