breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी तयार केला चक्क सोन्याचा मास्क

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणुने संपूर्ण देश हादरला आहे. सोन्याचा शर्ट तयार करून घेतल्यानंतर भोसरीचे दत्ता फुगे चर्चेत आले होते. त्याच धर्तीवर आता भोसरीतील उद्योजक शंकर कु-हाडे यांनी कोरोना विषाणुचा प्रतिकार करण्यासाठी चक्क सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे. त्याची किंमत तब्बल 2 लाख 89 हजार रुपये एवढी आहे. दत्ता फुगे यांच्यानंतर आता शंकर कु-हाडे यांची गोल्डमॅन म्हणून ओळख वाढत आहे.

दत्ता फुगे यानी स्वत:साठी सुमारे एक कोटी 27 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता. त्यातून त्यांनी पुण्यातील गोल्डमॅन म्हणून प्रसिध्दी मिळवली होती. दरम्यान, त्यांचा खून झाला. त्यानंतर आता कोरोनाचा कहर सुरू असतानाच शंकर कु-हाडे यांनी सोन्याचा मास्क घेतल्याने सर्वत्र त्यांची चर्चा सुरू आहे. तब्बल साडेपाच तोळे सोन्यापासून हा मास्क तयार करण्यात आला आहे. त्याची किंमत जवळपास 3 लाख एवढी आहे.

शंकर कु-हाडे हे गोल्डमॅनच आहे. भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीनजीकच्या गंधर्वनगरीत त्याचं घर आहे. त्यांना सोन्याचे दागिने घालण्याची आवड आहे. त्यांच्या अंगावर तीन किलो सोन्याचे दागिने आहेत. गळ्यात जाड सोन्याची चेन, हाताच्या 10 ही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या आणि मनगटावर सोन्याचं ब्रेसलेट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button