breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात साकारणार महात्मा गांधीेचे स्मारक

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक उभारले जाणार आहे. स्मारकाची उभारणी आदित्य बिर्ला ग्रुप करणार असून, त्यासाठी पालिका पिंपरीतील पुणे-मुंबई जुन्या महामार्गाजवळी एमएसईबी सबस्टेशनसाठी राखीव 2 एकर जागा देणार आहे. त्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.19) मंजुरी दिली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. महात्मा गांधीचे स्मारक खासगी तत्वावर उभारण्यास पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. शहराचे पर्यटन वाढावे, गांधींच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून स्मारकाची गरज असल्याचे प्रशासनाचे मत आहे. बिर्ला गु्रपचे संचालक राजश्री बिर्ला यांनी गांधींचे स्मारक उभारणीसाठी जागेची मागणी पालिकेकडे केली होती. स्मारकाचे संपूर्ण बांधकाम खर्च, देखभाल व दुरूस्ती बिर्ला ग्रुप करणार आहे. जागेचा व स्मारकाचा ताबा पालिकेकडे राहणार आहे.

त्यासाठी पिंपरीतील सर्व्हे क्रमांक 26/1/2, 28/1अ/1ब/2, 30/1/2 पै. सिटी सर्व्हे क्रमांक 4694 मधील आरक्षण क्रमांक 124 येथील एमएसबी सबस्टेशनसाठी आरक्षित 6 हजार 806.58 चौरस मीटर जागेची मागणी बिर्ला गु्रपने केली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम 79 (क) नुसार त्यास स्थायी समितीने बुधवारी मंजुरी देऊन पालिका सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.
………………..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button