breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात राहणार्‍या सर्वच समाजाचा मी घटक – आमदार महेश लांडगे

  • चर्‍होलीत बारी समाज विकास मंचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये राहणार्‍या सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक समाजाचा मी घटक असून याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन भोसरी विधानसभेचे आमदार तथा पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी केले.

चर्‍होलीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात रविवार (दि. 26) बारी समाज विकास मंचचा स्नेहमेळावा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेश लांडगे बोलत होते. व्यासपीठावर मनोहर लोढे, ओंकार काटोले, संजय बारी, सुमती बारी, शोभा केदार, विनायक भोंगाळे, कविता भोंगाळे, कडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, मी ज्या शहराचे नेतृत्व करतोय त्या शहरातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज समाधानी असला पाहिजे. अशा विचारांचा मी आहे. त्यामुळे जात पात न बघता तुमचा प्रतिनिधी म्हणून मी काम करीत आहे. त्यामुळे शहरात वावरताना कुठलीही चिंता, अथवा भय मनात धरू नका. काही अडचणी असल्यास संपर्क साधा. तुमच्या तक्रारी त्वरित मार्गी लावल्या जातील, असे आश्‍वासन देखील त्यांनी दिले. बारी समाज हा शेतकरी आणि कष्टाळू समाज आहे. या समाजाची मोठी संख्या शहरात असून मला नेतृत्वाची संधी दिल्याबद्दल आभारी असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार कोटोले यांनी केले. दरम्यान, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्ती तसेच महिलांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. तसेच, खेळ रंगला पैठणीचा या खेळातून सूत्रसंचालक भरत बारी यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. या खेळातील तीन विजेत्या कविता ढगे, जयश्री चौधरी, शोभा केदार या महिलांना पैठणी देवून गौरविण्यात आले. आभार ओंकार काटोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. अतुल कोल्हे, राजेंद्र काळपांडे, संतोष ढगे, सुरेश अस्वार, विठ्ठल ढगे, शेषराव नानकडे, मनोहर पवार, विठ्ठल कपले, समाधान कपोते, दिनेश रौंदळ, नितीन मिसाळ, योगेश ढगे, महादेव केदार, अरविंद हागे, विजय कोथळकर, मंगेश थोरात, आतिष ढगे, विवेक काटोले, आनंद दामधर, डॉ. अरुण अंबडकर, अशोक बोडखे, रामदास अंबडकर, डॉ. गौरव राऊत यांनी परिश्रम घेतले. 


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button