breaking-newsमहाराष्ट्र

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

चार महिन्यांचे घरभाडे दिले नाही म्हणून भाडेकरूंचे सामान घराबाहेर फेकून जातिवाचक शिव्या दिल्याबद्दल मालकाविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अधिनियमान्वये (अट्रॉसिटी)  पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भाडेकरू हे गेल्या अनेक वर्षांपासून टेंभोडे चाफेकर महाविद्यलयानजीकच्या पपईवाडी येथील लालचंद यादव यांच्या खोलीत राहत आहेत. घरभाडे दिले नाही म्हणून घरमालकाने खोलीला असलेले कुलूप परवानगीशिवाय तोडले व त्यांचे सामान घराबाहेर फेकून दिले होते. भाडेकरू उमेश धोडी यांचे सुमारे ८० हजार रुपयांचे सोने व रोख रक्कम या वेळी गहाळ झाली होती. घरमालकाने उमेश यांना जातिवाचक शिवीगाळ केल्यामुळे उमेश यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच घरमालक लालचंद यादव व इतर यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button