breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना निलंबित करा, राष्ट्रवादी काॅंग्रेसची मागणी

मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्याना देणार पत्र; आयुक्तांच्या दुर्लक्षामुळे येस बँकेत पैसे अडकले

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी राष्ट्रीयकृत बॅंकेतील पैसे काढून खासगी बॅंकेत ठेवले. त्यामुळे खासगी बँकेतील पैसे आणि काम काढून घ्यावे, असं राष्ट्रवादी काॅंग्रेसने यापुर्वीच कल्पना दिली होती. त्याकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याने एक हजार कोटी रुपये अडकले आहेत. याला सर्वस्वी आयुक्त हेच जबाबदार असून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून सदरील पत्र देण्यात येणार आहे. तसेच आयुक्तांवर निलंबनाची कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे उपस्थित होते.

सध्या आर्थिक वर्षाचा शेवटचा मार्च महिना असल्यामुळे मनपाकडे जास्तीत जास्त मिळकत कर व पाणी पट्टी जमा होते. परंतु सध्या या बॅकेवर आर्थिक निर्बध आल्यामुळे मनपाकडील मिळकत कर व पाणी पट्टी जमा करण्याचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे मनपाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. याला जबाबदार कोण ? आहे.

संजोग वाघेरे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका मिळकत कर, पाणीपट्टी व इतर सुविधा कर आकारते. ते वसूल करण्याचे काम महापालिकेने एस बँकेला दिले आहे. बँकने सब ठेकेदार नेमला असून कंत्राटी कर्मचा-यांमार्फत पैसे बँकेत जमा केले जातात. येस बँक डबघाईला आली आहे.

त्यामध्ये मोठ्या रकमा आहेत. बँक 600 कोटी नुकसानीमध्ये आहे. बँक अडचणीत येण्याअगोदर महापालिकेने पैसे काढून खाते तातडीने बंद करुन करदात्यांचे पैसे वाचवावेत, असे पत्र 4 डिसेंबर 2019 रोजी आयुक्तांना दिले होते. परंतु, आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पत्राला उत्तर देखील दिले नाही. आयुक्त हर्डीकर यांच्यामुळे करदात्यांचे एक हजार कोटी बँकेत अडकले आहेत. याला जबाबदार असणारे आयुक्तांवर कारवाई करावी करण्यात यावी, असे वाघेरे म्हणाले.

नागरिकांचे कररुपी पैसासुद्धा एस बँकेत अडकल्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. यावर भाजपचे कसलेही नियंत्रण नाही. परंतु, महापालिका लुटायला भाजप पदाधिकारी बसले असून या प्रकाराला दोन्ही आमदार देखील तितकेच जबाबदार आहेत, असा आरोपही करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button