breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी, (महाईन्यूज) – लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या तरुणाने मुलीचे 18 वर्षे वय पूर्ण होताच लग्नास नकार दिला. मुलीचे आई-वडिल विचारणा करण्यासाठी मुलाच्या घरी गेले असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून घरातून हाकलून दिल्याचा प्रकार देहूरोडमध्ये घडला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात एकावर अत्याचाराच्या गुन्ह्यासह अन्य गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

अभय शिवाजी शिंदे हा आरोपी असून याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित मुलगी 2014 मध्ये अल्पवयीन होती. त्यावेळी अभय शिवाजी शिंदे याने लग्न करण्याचे वचन देऊन मुलीचा विश्वास संपादन केला. तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर अभय शिवाजी शिंदे याने लग्नास साफ नकार दिला. त्यावर पीडित मुलीचे आई-वडिल याबाबत विचारणा करण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले. याप्रकरणी देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button