breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयांकडून 37 मतदान केंद्रावर करडी नजर

पिंपरी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील 37 मतदान केंद्र हे सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. त्या सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासह मावळमध्ये मतदान शांततेत व्हावे, याकरिता निवडणूक आयोग व पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

पिपंरी-चिंचवड शहराचा विचार केला असता पिंपरी-चिंचवड शहरातील 3 विधानसभा मतदारसंघामध्ये 37 मतदारसंघ संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पिंपरीत सर्वाधिक 19, चिंचवडमध्ये 12 आणि भोसरीत सर्वात कमी 6 केंद्र संवेदनशील आहेत. या केंद्रांवर पोलिसांचा, केंद्रीय सुरक्षा दलाचा अतिरिक्त फौजफाटा तैनात राहणार आहे. या शिवाय प्रत्येक संवेदनशील मतदान केंद्रावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात येणार आहे. या निरीक्षकाच्या माध्यमातून या मतदान केंद्रांचा संपूर्ण अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button