breaking-newsमुंबई

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तारखा, गाइडलाइन्स जाहीर

मुंबई – अंतिम वर्षाच्या परीक्षांचा पॅटर्न मुंबई विद्यापीठाने आज जाहीर केला. बहुपर्यायी पद्धतीने ऑनलाईन होणाNया या परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी महाविद्यालयांवर असणार आहे. बॅकलॉगच्या परीक्षा 25 सप्टेंबरपासून तर नियमित परीक्षा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. 50 गुणांची परीक्षा असणार असून त्यासाठी एक तासाचा कालावधी असणार आहे. परीक्षा कशा पध्दतीने घ्यायच्या त्यासंदर्भात विद्यापीठाने मार्गदर्शक तत्वे आज पुढीलप्रमाणे जाहीर केली.

  • 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षाच्या पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याच्याच परीक्षा घेण्यात याव्यात.
  • विद्यार्थी सध्या कुठे आहेत, त्यांचे मोबाईल व पीएनआर क्रमांक, परीक्षेसाठी त्यांच्याकडे उपलब्ध असणारे संगणक, लॅपटॉप आदी साहित्य यासंदर्भातील माहिती महाविद्यालयांनी जमा करावी.
  • मार्च 2020 मध्ये प्रात्यक्षिक, तोंडी, प्रकल्प अशा परीक्षा घेण्यात आल्या असतील तर त्या पुन्हा घेऊ नयेत.
  • परीक्षेच्या आयोजनासाठी शाखानिहाय महाविद्यालयांचे गट बनवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील एक महाविद्यालय इतरांचे नेतृत्व करून विद्यापीठाच्या सूचनांनुसार परीक्षांचे नियोजन करेल.
  • प्रलंबित परीक्षा शुल्क महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे जमा करावे.
  • विद्यापीठांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आसन क्रमांक देण्यात आले आहेत. त्याचा वापर महाविद्यालयांनी परीक्षेसाठी करावा.
  • परीक्षांसाठी आवश्यक अहवाल एमकेसीएल पोर्टलवर उपलब्ध
  • अंतर्गत गुणांच्या नोंदी 15 सप्टेंबरपर्यंत कराव्यात.
  • प्रॅक्टीकल, प्रोजेक्ट, व्हायवा परीक्षा राहिल्या असतील तर त्या ऑनलाईन किंवा दूरध्वनीद्वारे 15 सप्टेंबरपासून घ्याव्यात
  • परीक्षा एकाच वेळी घेण्यात येतील असे वेळापत्रक बनवावे
  • सर्व थिअरी परीक्षा 17 ऑक्टोबरपर्यंत घ्याव्यात.
  • 13 मार्च 2020 पर्यंत शिकवलेल्या अभ्यासक्रमावरच परीक्षा घ्याव्यात.
  • अपवादात्मक स्थितीतच ऑफलाईन परीक्षा घ्यावी.
  • सरावासाठी विद्यार्थ्यांना नमुना प्रश्नपत्रिका द्याव्यात.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button