breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये सव्वा दोन हजार गतिरोधक नियमबाह्य; आयआरसी व वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन

जागृत नागरिक महासंघाने घेतला आक्षेप; 111 गतिरोधक वाहतूक विभागाच्या परवानगी बनविले

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने भारतीय रोड काॅंग्रेसच्या (आयआरसी) नियमांचे उल्लंघन केले आहे. वाहतूक विभागाची परवानगी न घेताच मुख्य व अंतर्गत रस्त्यावर सुमारे दोन हजार 240 गतिरोधक बनविलेले आहेत. नियमबाह्य बनविलेल्या गतिरोधकामुळे वाहनचालकांना माण, पाठ, आणि कंबर दुखीचे त्रास सुरु झाले आहे. त्यामुळे जागृत नागरिक महासंघाने नियमबाह्य गतिरोधकावर आक्षेप नोंदविला असून अशास्त्रीय पध्दतीने बनविलेल्या गतिरोधक तत्काळ हटवण्याची मागणी महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी केली आहे.

याबाबत महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभागात स्थापत्य विभागाचा मनमानी कारभार सुरु आहे. स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता हे प्रभागातील नगरसेवकांच्या मागणीनूसार वाटेल तिथे गतिरोधक बनवू लागले आहेत. हे गतिरोधक अशास्त्रीय असून ते वाहतूक विभागासह भारतीय रोड काॅंग्रेसच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. या गतिरोधकामुळे दुचाकी वाहनचालकांना माण, कंबर, पाठ, मणक्याचे विविध आजार बळावू लागले आहेत.

भारतीय रोड काँग्रेस (आयआरसी) च्या नियमानुसार गतिरोधकांची उंची व लांबी ठरविण्यात येते. मात्र, शहरातील 90 टक्के गतिरोधकांची बांधणी आयआरसीच्या नियमांना डावलून करण्यात आली आहे. जागरूक नागरिक महासंघाने दोन महिने सर्वेक्षण करून याबाबतचा तपशील गोळा केला. परिसरातील राजकीय व्यक्तींच्या आदेशावरून नियमबाह्य गतिरोधकांचे काम करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

शहरात वाहतूक विभागाच्या परवानगीने बांधण्यात आलेल्या 111 गतिरोधकांमध्ये हिंजवडीतील 44, निगडी 21, चिंचवड 21, भोसरी 11, पिंपरी 7 तर सांगवी येथील पाच गतिरोधकांचा समावेश आहे. शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील देहू आणि चाकण येथील सर्व गतिरोधक नियमबाह्य आहेत. महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग या प्रभागात आयआरसीनूसार 617 गतिरोधक आणि आयआरसीचे उल्लंघन करुन 2 हजार 240 गतिरोधक बनविले आहेत. तर वाहतूक विभागाची परवानगी घेवून 111 गतिरोधक बनविलेले आहे. त्यामुळे शहरात सुमारे 2 हजार 968 गतिरोधक बनविले गेले आहेत. शहरातील बहुसंख्य गतिरोधक ओबडधोबड, अशास्त्रीय पध्दतीने बांधलेले आहेत. त्याचा फटका वाहनचालकांना बसू लागला आहे.

आयआरसीच्या नियमानुसार बांधलेले गतिरोधक जास्त परिणामकारक नसतात. त्यांच्या नियमानुसार गतिरोधकाची उंची ही 10 ते 12 सेंटीमीटर आणि रुंदी दोन्ही बाजूला सुमारे सहा फूट अपेक्षित आहे. शहरातील रस्त्यांसाठी ते अशक्य असते. महामार्गावरील गतिरोधकांसाठी वाहतूक विभागाचा अभिप्राय घेण्यात येतो. मात्र, अंतर्गत मार्गासाठी अभिप्राय घेतला जात नाही.

  • शिरीष पोरेड्डी, प्रवक्ता, स्थापत्य विभाग महापालिका

शहरात नियमबाह्य बनविलेले गतिरोधक त्वरित काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गतिरोधकांमुळे पाठ, माण व कंबरेचे त्रास सुरू झाले आहेत. वाहनांची अवस्थादेखील खिळखिळी झाली आहे. अनेक गतिरोधकामुळे चारचाकी वाहनांचा खालचा भाग घासून जातो, त्यामुळे वाहनांचे नुकसान होते.

  • नितीन यादव, अध्यक्ष, जागृत नागरिक महासंघ
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button