breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये समान पाणीवाटपासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांचा ‘मास्टर प्लॅन’

  • महापौर, आयुक्तांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
  • पाणीपुरवठा नियोजनात अडथळा झाल्यास संबंधितांवर पोलीस तक्रार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी | महा ई न्यूज |

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना समान पाणीपुरवठा व्‍हावा. याबाबत महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील सुसंवाद वृद्धींगत करीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी ‘मास्टर प्लॅन’तयार केला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा सक्षम होईल, असा विश्वास महापालिका स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना समान पाणीवाटप व्हावे. यासाठी पाणीपुरवठा नियोजनाबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे अध्यक्षतेखाली जलशुद्धीकरण केंद्र, से.क्र.२३ येथे गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे सभापती विलास मडेगिरी, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हार्डीकर, प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसेवक संदीप कस्पटे, ममता गायकवाड, सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, रामदास तांबे, रवींद्र पवार, दत्तात्रय रामुगडे, संदेश चव्हाण, मे.विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लि. व कन्सलटंट डी.आर.ए. यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


नागरिकांना दुप्पटपाणीपुरवठा करा- आमदार जगताप

पिंपरी-चिंचवड शहरात सद्यस्थितीत एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने नागरिकांना दुप्पट पाणीपुरवठा करणेबाबतचे आदेश आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले. शहरातील ४० टक्के भागात २४x७ पाणीपुरवठा योजना राबविणे या कामांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र से.क्र.२३., येथून डांगे चौकपर्यंत टाकण्यात येणरी १००० मिमी व्यासाची पाईपलाईनमुळे शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. त्या जलवाहिनीचे काम पेठ क्रमांक २३ येथील जलशुध्दीकरण केंद्र ते थेरगांव येथील डांगे चौका पर्यंत सुमारे ७.६० कि.मी. लांबीचे प्रस्तावित आहे. संबंधित काम निर्धारित वेळत मार्गी लावण्याबाबत आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.


  • काय आहे आमदार जगताप यांचा ‘मास्टर प्लॅन’…
  • शहरातील जलवाहिनीचे हायड्रो टेस्टींगच्या कामासह सदर जलवाहिनीचे उर्वरित सर्व काम दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ पूर्वी पूर्ण करणार.
  • यासाठी ठेकेदाराने पुढील दोन दिवसांत सदर कामाचा ३ महिन्याच्या आत काम पुर्ण करणेचा बारचार्ट सादर करण्याचे आदेश.
  • त्यानुसार कामाच्या प्रगतीबाबत दर बुधवारी स्थायी समिती सभा संपलेनंतर महापौर, उपमहापौर, पक्षनेता, सभापती, स्थायी समिती , अन्य पदाधिकारी , आयुक्त , संबंधित अधिकारी व प्रकल्प सल्लागार, कंत्राटदार यांचे बरोबर साप्ताहिक आढावा बैठक घेण्यात यावी.
  • सर्व सदनिका धारकांनी जमिनीखाली पाण्याची टाकी बांधणे आवश्यक असून मनपा त्यांच्या जमिनीखाली असलेल्या टाकीपर्यंत पाणीपुरवठा करण्यास बांधील राहील.
  • पाणीपुरवठा विषयक विकास कामांतर्गत कुढल्याही प्रकारचे कामास अडवणूक झाल्यास सदर बाबत मनपाच्या वकिलांनी सदर बाबतची माहिती घेऊन पोलिस तक्रार दाखल करावी. या कामात विभागातील अधिकाऱ्यांनी फक्त माहिती देणे अपेक्षित असेल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button