breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

“शिवरायांना अभिप्रेत असणारा न्याय पोलिसांनी पीडितेला मिळवून दिला”

महाईन्यूज | मुंबई

हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या एन्काउंटरच्या वृत्तानंतर सोशल मिडियावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनीही सोशल मिडिया वरून या एन्काउंटरप्रकरणी ही प्रतिक्रिया दिली आहे.

खोपकर यांनी एक ट्विट करुन चारही आरोपींचा एन्काउंटर करणाऱ्या हैदराबाद पोलिसांना सलाम केला आहे. “छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला न्याय पीडितेला मिळवून दिला, याबद्दल हैदराबाद पोलिसांचं मन:पूर्वक अभिनंदन. अशा नराधमांची खांडोळीच करायला हवी,” असं ट्विट खोपकर यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button