breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात 20 व्या महापाैर परिषदेचे आयोजन
- महापाैर राहूल जाधव यांची माहिती
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राज्यातील महापाैरांची 20 वी महापाैर परिषद 25 व 26 आॅगस्ट आयोजित करण्यात आली आहे, या महापाैर परिषदेचे उद्घाटनास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापाैर राहूल जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले की, राज्यातील महापौरांची 20 वी महापौर परिषद पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात आलीय, या परिषदेला राज्यातून तब्बल 27 महापाैर उपस्थित राहणार आहेत. महापौर परिषदेचे अध्यक्ष तथा मुंबईचे महापौर प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर, व उपाध्यक्ष तथा नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी आयोजनाची संधी पिंपरी चिंचवड महापालिकेला दिली आहे.