breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लुई ब्रेल’ यांचा पुतळा उभारण्यात यावा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – लुई ब्रेल आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अंध अपंग विकास असोसिएशन संस्थेत मोठ्या उत्साहात साजरी झाली.

संस्थेचे अध्यक्ष दिनकर गायकवाड यांच्या शुभहस्ते लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. युवा संघटक अलोक गायकवाड यांच्या शुभहस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

बी. आर. माडगूळकर म्हणाले की, अंध अपंगाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलीची पहिली शाळा पुण्यामध्ये भिडे वाड्यात सुरु केली आहे. तर, लुई ब्रेल लिपीची शोध लावून अंधांचे जीवन प्रकाशमान केले. त्यांच्या जीवनात प्रगतीची वाट निर्माण केली.

याप्रसंगी यशवंत कण्हरे म्हणाले, अंध अपंगांना मदत करणे डोळस समाजाची जबाबदारी आहे. अंध अपंगांची सेवा ही खरी ईश्वर सेवा आहे. त्यांची सेवा हे पुण्याचे काम आहे.

अंध अपंग विकास असोसिएशन अध्यक्ष दिनकर गायकवाड म्हणाले, आयुष्यात अंध अपंगाची सेवा करत आहे. मी स्वतः अंध आहे, अंध अपंग मुलासाठी वसतिगृह व शाळा काढणे हे माझे ध्येय आहे. अंधांसाठी लुई ब्रेल यांचा पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महापालिकेत पुतळा उभा करावा. लुई ब्रेल यांना आदरांजली वाहिली प्रदीप गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमात गंगाराम गोजस्ट, आर. एम. गुब्याड, डी. जे. डोके, एच. डी. निकम, अलोक गायकवाड, जयराम दहातोंडे, नरेंद्र निकाळजे, किरण गायकवाड, रुक्मिणी चिहेवार, शंकर बोरकर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button