पिंपरी / चिंचवड

रक्तदान शिबिरात 49 जणांनी घेतला सहभाग

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिवेसेनेचे विभागप्रमुख अनिल पारचा यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथे आज मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न झाले.

या शिबिरात २०० जणांची आरोग्य तपासणी झाली तर ४९ जणांनी रक्तदान केले. भोसरी येथील ओम हॉस्पिटलच्या सहकार्याने येथील वाल्मिकी आश्रमात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्‌घाटन आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते झाले. यावेळी एससी एसटी आयोगाचे माजी अध्यक्ष चरणसिंग टाक, सफाई मजदूर काँग्रेसचे महामंत्री डॉ. पणीकर दास, संयोजक अनिल पारचा, शिवसेनेच्या संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, नगरसेविका निकिता कदम, माजी नगरसेवक अरूण टाक उपस्थित होते.

यावेळी ईसीजी, रक्तदाब, मधुमेह त्याचबरोबर अन्य व्याधींची तपासणी झाली व शस्त्रक्रियेसाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेनेच्या सरिता साने, राजू खैरे, प्रतापसिंह खैरारिया, रविंद्र कजानिया, बबलू सोनकर, आदिती चावरिया (सौदे), सुशिल मंचरकर, महा प्रदेश अध्यक्ष मोहन बिडलग, पिं. चिं. अध्यक्ष राजू परदेशी, रोमी संधू, राजेश बडगुजर, महेंद्र सोनवले आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button