breaking-newsआंतरराष्टीय

अबू बक्र अल-बगदादी ठार – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करत सुटलेला ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ अर्थात आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्याविरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाल्याच्या वृत्ताला डोनाल्ड ट्रम्प यांनी पुष्टी दिली आहे. अमेरिकेनं आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीचा खात्मा करण्यासाठी आज सकाळी सीरियामध्ये मोठी मोहीम हाती घेतली होती.

ANI✔@ANI

#WATCH US President Donald Trump: He (Abu Bakr al-Baghdadi) will never again harm another innocent man, woman or child. He died like a dog, he died like a coward. The world is now a much safer place.13.1K7:31 PM – Oct 27, 2019Twitter Ads info and privacy3,237 people are talking about this

बगदादी हा एका भूयारात लपला होता. अमेरिकन सैन्याने केल्या आत्मघातकी हल्ल्यात तो मारला गेला आहे. तसेच बगदादीसोबत लपलेले त्याचे तीन मुलेही मारले गेले असल्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणले की कुठलाही बगदादी आता कुठल्याच निष्पाप माणसाला, स्त्रीला किंवा मुलांना इजा पोहचविणार नाही. कारण हा बगदादी कुत्र्यासारखा मरण पावला असून, त्यामुळे आता जग हे एक सुरक्षित ठिकाण झालं आहे.

अमेरिकेने रविवारी सकाळी ही कारवाई केल्यानंतर ट्रम्प यांनी काहीतरी मोठं घडतंय, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आज संध्याकाळी उशिरा त्यांनी बगदादी मारला गेल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button