breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्यांवर बंदी घाला – राष्ट्रवादीचे श्रीनिवास बिरादार यांची मागणी

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्रीनिवास बिरादार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात श्रीनिवास बिरादार यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीतील फटाके यामुळे प्रदूषण वाढण्याचा धोका असून त्याचा सर्वाधिक त्रास कोरोना रुग्णांना होणार आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची संकल्पना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडली आहे.

त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रतिसाद देऊन शहरात फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी. मोठ्या आवाजाचे आणि जास्त धूर सोडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोना हा श्वसन घेण्यास त्रास देणारा आजार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करण्यासाठी महापालिकेने सकारात्मक पाऊले ऊचलून तात्काळ फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button