breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड…

महाईन्यूज | मुंबई

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याची घोषणा रविवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केली. त्यानंतर सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे अभिनंदन केले. पटोले म्हणाले, “विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपाने आपल्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मी भाजपाला मान्यता देत आहे. तसेच भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस हे १ डिसेंबर २०१९ पासून विरोधी पक्ष नेते असतील असे मी जाहीर करतो.”

दरम्यान, फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या दिवसाची मला अपेक्षाही नव्हती, मी इथं येईन अस कधीही म्हटलं नव्हत पण आलो, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. “आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, २५ ते ३० वर्षे जे आमच्या विरोधात होते ते मित्र झालेत तर जे मित्र होते ते आज विरोधात बसलेत. फडणवीसांशी असलेली मैत्री आपण कधीही लपवलेली नाही त्यांच्याकडून मी ५ वर्षांत बरचं काही शिकलो. कुठलीही गोष्ट मी काळोखात केली नाही. पदावर बसून न्याय देऊ शकलो नाही तर मी अपराधी, असेन” असेही यावेळी ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button