breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

40 लाखाची मोटार चक्क कचरा वाहतूकीस देणार ; गाडी मालकाचा अजब निर्णय

पिंपरी –  लाखो रुपये किंमतीची असलेली मोटार सतत तांत्रिक बिघाडाने ना-दुरुस्त होवू लागली. त्यात संबंधित शोरुमकडून मोटारीची वेळेत दुरुस्ती होत नसल्याने पिंपरीतील एका उद्योजकाने लाखो रुपये किंमतीची मोटार ही महापालिकेला कचरा वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याचा अजब निर्णय घेतला. या निर्णयाने तरी कंपनीचे लोक त्या मोटारीकडे लक्ष देतील, असे नाराजी संबंधितानी व्यक्त केली.

पुणे-मुंबई रस्त्यावरील एका टोयाॅटो शो-रूममधून हेमराज चौधरी यांनी सुमारे 40 लाखाची एक मोटार खरेदी केली. परंतु, ही मोटार खरेदी केल्यानंतर काही दिवसांत मोटारीच्या तांत्रिक अडचणी निर्माण होवू लागल्या. या अडचणीकडे संबंधित शो-रूमकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याने बुधवारी त्याचा वापर कचरा टाकण्यासाठी करावा, असे आवाहनच चौधरी यांनी केले. एवढेच नाही, तर गुरुवारपासून ही गाडी महापालिकेला कचरा वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ग्राहकाने आपल्याच कंपनीकडून वाहने घ्यावीत, याकरिता जाहिराती केल्या जातात. विक्रीनंतर पुढील काही वर्षे मोफत सेवा आणि सर्व्हिसिंग करून दिली जाईल, असे प्रलोभनही दाखविले जाते. परंतु, विक्रीपश्चात योग्य सेवा न मिळाल्याने थेट मोटारच कचरा वाहतुकीला देण्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे.

दरम्यान,  लाखो रुपयांची कार खरेदी केल्यावर अशा पद्धतीची वागणूक जर कंपनीच्या लोकांकडून मिळत असेल, तर यांच्या गाड्या कचरा वाहतुकीला देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याबाबत कोर्टात दावाही दाखल करणार आहोत. तसेच, माझ्यासह अन्य ज्या लोकांनी या मॉडेलच्या गाड्या घेतल्या आहेत, त्यांना एकत्र करून सर्वांच्या गाड्या कचरा वाहतुकीला देण्याचा विचार करीत आहोत, असे  हेमराज चौधरी यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button