breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा आर्शिवाद; गुटखा विक्री, जूगार, अवैध दारु धंदे जोरात

  • पोलिसांच्या अर्थपुर्ण वाटाघाटीनंतर अवैध धंद्यात वाढ
  • वरिष्ठ पोलीस अधिका-यांचे होतेय दुर्लक्ष 

  विकास शिंदे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारी, अवैध धंदे बंद होतील, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांची होती. मात्र, पोलिस आयुक्तालय होवून अवैध धंदे बंद झालेले नाहीत. पोलिस आयुक्तालयाच्या सर्वच पोलिस स्टेशन हद्दीत गुटखा विक्री, जूगार अड्डे आणि अवैध दारु धंदे जोमात वाढले आहेत. पोलिसाच्या अर्थपुर्ण वाटाघाटीनंतर अवैध धंद्यात प्रचंड वाढ झाल्याने गुन्हेगारांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. याकडे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. 

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पोलिस स्टेशन हद्दीत खुलेआम अवैध धंदे जोरात सुरु आहेत. काही पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच मटका, जुगार, गुटखा विक्री चालु असतानाही पोलीस याकडे ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. पोलीस आंधळ्य़ाची भूमिका घेत असल्याने त्या-त्या परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत.  दारू, गांजा, मटका, जुगार असे अनेक अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. अनेक गल्लीबोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, हॉटेलवर मिळणारी दारू पेय यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच गुन्हेगारांचे शहरात वर्चस्व वाढून हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारांकडे पोलीस जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. शहरातील रात्रीच्या वेळी घडणार्‍या गुन्ह्यांचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही. रात्रीच्या काळोखात उद्योगनगरीमध्ये गुन्हेगारांचाच सुळसुळाट सुरू आहे. रात्रीची गुन्हेगारी कमी करण्याचे एक आव्हान पोलीसांसमोर उभे ठेकले आहे.

लूटमार, मारामाऱ्या, चोऱ्या, विनंयभंग, अत्याचार या घटनांमुळे अधिक बेजार झालेल्या नागरिकांना आता खून, दरोडा-याची धास्ती वाटू लागली आहे. राजकीय वैमनस्य आणि आर्थिक लाभापोटी गुन्ह्याचे प्रमाण अधिकच वाढताना दिसत आहे. पोलिस आयुक्तालयातंर्गत बदली होवून नव्याने विविध पोलिस स्टेशनचा पदभार घेतलेल्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान आहे. तसेच स्थानिक गुन्हेगारांना काबूत ठेवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे.

पोलिस स्टेशनाच्या हद्दीतील सट्टा, चोरी, जुगार, मटका, रोड रोमिओ, लुटमार, अवैध वाहतूक, बेकायदा दारू विक्री यांसारख्या अवैध धंद्यात वाढ झालेली आहे. तसेच गटा – गटांमध्ये होणारी धुसफूस,  ते गंभीर हाणामाऱ्या, खून, दरोडे, वाढता सायबर क्राईम याबाबत पोलिस अधिका-यांना सतत अलर्ट राहावे लागणार आहे.

उद्योगनगरीतील खुलेआम अवैध धंदे

निगडी पोलिस स्टेशन हद्दीत – अंकुश चाैक स्पाईन रोड निगडी, खडी मशीन खंडोबामाळ चाैक आकुर्डी, विवेकनगर भाजी मंडईजवळ आकुर्डी, सीएनजी पंपाजवळ दुर्गानगर चाैक खुलेआम अवैध धंदे सुरु आहेत. 

  क्रमशा;

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button