breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये कोविड केअर सेंटरसाठी अडीच हजार स्वयंसेवक

स्थायी समितीकडून ऐनवेळी मान्यता,  दररोज 300 रूपये देणार मानधन

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड केअर सेंटरची उभारणी ठिकठिकाणी केली जात आहे. तेथील कामकाजासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. त्याकरीता महापालिका 2 हजार 500 स्वयंसेवक नियुक्त करणार आहे. त्यांना दरदिवसाला 300 रूपये मानधन दिले जाणार आहे.

शहरातील करोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने नवीन रूग्णालय व कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. आणखी रूग्णालय व सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. तेथील कामकाजासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे पालिकेने स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यास 2 हजार 500 स्वयंसेवकांनी प्रतिसाद देत नावनोंदणी केली आहे.

स्वयंसेवकांची नेमणूक रूग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये केली जाणार आहे. त्यांच्याकडून स्वयंघोषणापत्र घेण्यात येणार आहे. किमान 4 तास किंवा जास्त तास काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रतिदिन 300 रूपये मानधन दिले जाणार आहे. जितके दिवस काम तितके दिवस मानधन दिले जाणार आहे. या आयुक्तांच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी (दि.22) मंजुरी दिली आहे.

तसेच, क्षेत्रीय कार्यालयस्तरावर फिल्ड सर्व्हिलन्स टिम तयार करण्यात आल्या आहेत. त्यांना शहरात सर्वत्र फिरण्यासाठी 28 वाहने आरटीओच्या दराने 6 महिन्यांसाठी भाडेतत्वावर घेण्यात आले आहे. त्यासाठी 1 कोटी 22 लाख खर्चास समितीने मंजुरी दिली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button