breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नॉन कोविड रुग्णांना मोबाईलवरुन डाॅक्टर देणार औषधोपचारांचा सल्ला

स्थायी समितीची मान्यता, तीन महिन्यात तीस लाखाचा होणार खर्च

पिंपरी |महाईन्यूज|

शहरातील नॉन कोविड रुग्णांना मोबाईलच्या माध्यमातून उपचार घेता येणार आहे. मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी या ऍपद्वारे टेलिमेडीसीनची सुविधा पुरविली जाणार आहे. त्यासाठी तीन महिन्याकरिता तीस लाखांचा खर्च केला जाणार आहे. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.

शहरात करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहेत. सद्यस्थितीत करोना साथीव्यतिरिक्त अन्य आजारांवर शहरातील नागरिकांना मोबाईलद्वारे औषधोपचार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. या सुविधेचा शहरातील नागरिकांना वापर होण्यासाठी ही सुविधा पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल ऍपशी कस्टमाइज करून आवश्‍यक तो करारनामा करण्यासंदर्भात पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. याचे अधिकृत वितरक रेवमॅक्‍स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्‍चर्स हे आहेत. त्यानुसार त्यांना कामकाजाचे आदेश देण्यात येणार आहे.

शहरातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही सुविधा तीन महिन्यासाठी कार्यन्वित करण्यात येणार आहे. यासाठी 29 लाख 50 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. टेलिमेडीसीन ऍप्लिकेशनद्वारे कन्सल्टिंग करण्यासाठी महापालिकेने वैद्यकिय अधिकारी, तसेच सर्व सुविधेसह लॅपटॉप व इतर यंत्रणा उपलब्ध करून देणे आवश्‍यक असल्याचे प्रस्तवात नमूद करण्यात आले आहे. तीन महिने कालावधीसाठी येणाऱ्या 29 लाख 50 हजार रुपयांची रक्कम आयडीबीआय बॅंकेमार्फत सीएसआर अंतर्गत प्राप्त झाली आहे. त्यानुसार रेवमॅक्‍स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्‍चर्स यांच्याकडून निविदा न मागविता थेट पद्धतीने मात्र करारनामा करून कामकाज करण्यास स्थायीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button