breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आता भाजपाचा प्रभागनिहाय ‘युवा संवाद’

युवा मोर्चाच्या वतीने शहरातील युवकांसाठी व्यासपीठ

शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे मार्गदर्शन

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने  संपूर्ण शहरात प्रभागनिहाय ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी दिली.

भारतीय जनता पार्टी पिपंरी चिचंवड शहर अध्यक्ष आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरात युवकांना जोडण्यासाठी हा उपक्रम होत आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे संपुर्ण शहरामध्ये युवा वर्गाशी संवाद साधण्यासाठी “युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोशी, चिखली येथून उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.

“युवा संवाद कार्यक्रम हा शहरातील प्रत्येक प्रभागात राबवण्यात येणार असुन युवकांना केंद्रस्थानी ठेवुन त्यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल हाच मुख्य ऊद्देश” अस शहराचे अध्यक्ष संकेत चोंधे यांनी सांगीतले.

यावेळी संपुर्ण शहरातील प्रभागात पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, सोशियल मिडीया संयोजक विक्रांत गंगावणे,  सोशियल मिडीया संयोजक युवती पुजाताई अल्हाट, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश डोंगरे, व्यापारी आघाडीचे संयोजक राजेश राजपुरोहीत व ईतर आघाडीचे संयोजक भेटी देऊन युवकांशी संवाद साधणार आहेत.

यावेळी युवा नेते निलेश बोराटे, महिला मोर्चा उपाध्यक्ष सोनमताई जांभुळकर, चिटणीस रवि जांभुळकर, उपाध्यक्ष अतुल बोराटे, चिटणीस साई कोंढारे, चिटणीस पै. प्रकाश चौधरी, चिटणीस मिलींद रोकडे, गणेश बोराटे, अभिनय बोराटे, अनुप बोराटे, सिद्धेश बोराटे, अश्विन राजपूत, पूजा राऊत, नगमा खान, रुक्मिणी डोनगावे उपस्थित होते.

विविधी योजनांबाबत जनजागृती…

यावेळी युवकांशी आत्मनिर्भर भारत, रोजगाराच्या संधी व भविष्यातील व्यावसायिक संधी यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. तसेच युवकांना कौशल्य विकास, शहरात राबवण्यात येणाऱ्या विविध योजना याबद्दल माहिती देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button