breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील 154 बेघरांना महापालिकेचा निवारा

पिंपरी | महाईन्यूज

जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत पिंपरी भाजी मंडई येथे शहरातील बेघरांसाठी निवारा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या केंद्राचे उद्धाटन उद्या शनिवार (दि. १०) महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळी १० वाजता होणा-या या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेचे राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शासन निर्णयानुसार राज्यातील ५३ शहरांमध्ये दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत शहरी बेघरांना निवारा व्यवस्था करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिक्षेत्रात नागरी बेघरांचे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून सर्वेक्षण संस्था नेमण्यात आली होती. या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाअंती शहरात एकुण १५४ बेघर आढळून आलेले आहेत. या बेघरांसाठी निवारा केंद्र महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत पिंपरी भाजी मंडई येथील पहिल्या मजल्यावर हे केंद्र सुरू केले जाईल. शासनाने १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक बेघर दिन (World Homeless Day) म्हणुन साजरा करण्याचे सुचित केले आहे. या दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने “सावली” बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. खासगी संस्थेमार्फत हे केंद्र चालविले जाणार आहे. या केंद्रात एकुण २४ खोल्या असून यामध्ये ११० खाटांची व्यवस्था असणार आहे. तसेच याठिकाणी निवा-यासाठी येणा-या वृध्द, रुग्ण, दिव्यांग तसेच शुन्य ते चौदा वयोगटातील मुली व मुले यांना मोफत चहा, नाष्टा आणि जेवण इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button