breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’ मधील मेडिकल अखेर सुरू : अत्यावश्यक व बाह्य रुग्णांना सवलतीच्या दरात मिळणार औषधे!

कर्मचारी महासंघाच्या सत्ताधारी गटाने घेतला मेडिकलचा ताबा

पिंपरी : महापालिका कर्मचारी महासंघाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या वादात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) मेडिकल गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत होते. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात बाह्य रुग्ण आणि अत्यावश्यक विभागात दररोज उपचारास येणाऱ्या दोन- तीन हजार रुग्णांना बाहेरून गोळ्या-औषधे खरेदी करावे लागत होते. मात्र, कर्मचारी महासंघाच्या सत्ताधारी गटाने मंगळवारी रुग्णालयात येऊन मेडिकलचा ताबा घेतला असून लवकरच मेडिकल पुन्हा रुग्णांच्या सेवेत कार्यरत होणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक व बाह्य रुग्णांना दहा ते वीस टक्के सवलतीच्या दरात गोळ्या औषधे मिळणार असून रुग्णांना निश्चित दिलासा मिळणार आहे.

पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघाने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांसाठी मेडिकल सुरू केले होते. या मेडिकलमधून बाह्य रुग्ण विभाग आणि अत्यावश्यक रुग्ण विभागातील रुग्णांना तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांनादेखील दहा ते वीस टक्के सवलतीच्या दरात गोळ्या, औषधे मिळत होती. हे मेडिकल सुरू झाल्यामुळे वायसीएम रुग्णालयातील बाह्य रुग्ण व अत्यावश्यक विभागातील उपचारास येणाऱ्या दोन ते तीन हजार रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता.

महापालिका कर्मचारी महासंघाची मार्च २०२२ रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष असलेल्या अंबर चिंचवडे गटावर बबन झिंजुर्डे गटाने मात करत महासंघावर सत्ता मिळवली. निवडणुकीत झिंजुर्डे गटाने बाजी मारल्यामुळे महासंघाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला जाऊन तो न्यायालयात गेला होता. त्यानंतर महापालिका कर्मचारी महासंघ कार्यालयासह वायसीएम मेडिकलचा देखील ताबा मिळत नव्हता. सत्ताधारी झिंजुर्डे गटाला कर्मचारी महासंघाचा ताबा मिळाला, पण न्यायालयाच्या आदेशानंतर देखील वायसीएम रुग्णालयातील महासंघाच्या मेडिकलचा ताबा मिळत नव्हता. वायसीएम रुग्णालयातील मेडिकलमध्ये औषधांचा साठा किती शिल्लक आहे, याचा अहवाल सत्ताधारी झिंजुर्डे गटाने तत्कालीन चिंचवडे गटाकडे मागितला. मात्र, त्यावरून दोन्ही गटात वाद झाला. आजी-माजी पदाधिका-यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामुळे १५ मार्च २०२२ रोजी मेडिकल बद करण्यात आले. त्यानंतर आजतागायत आजी- माजी पदाधिका-यांच्या वादात हे मेडिकल बंद होऊन तब्बल अठरा महिने उलटले आहेत.

दरम्यान, महापालिका कर्मचारी महासंघाच्या सत्ताधारी गटाने मंगळवारी रुग्णालयातील मेडिकलचा पोलीस बंदोबस्तात ताबा घेत ते मेडिकल उघडण्यात आले. सध्य स्थितीत मेडिकलमधील उपलब्ध गोळ्या आणि औषधांचे आडिट करण्यात येणार असून किती स्टॉक शिल्लक होता. किती गोळ्या औषधांच्या तारखा एक्सप्रायर झालेल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी महासंघाचे मेडिकलमधील औषधांचे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानीचा रिपोर्ट अहवाल बनवणार आहेत.

हेही वाचा – ‘नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेणार’; शिंदे गटातील नेत्याचं विधान

आता चोवीस तास मेडिकल राहणार सुरू…

महापालिका कर्मचारी महासंघाने वायसीएम रुग्णालयात सुरू केलेले मेडिकल हे चोवीस तास सुरू असायचे, रात्री-अपरात्री कधीही रुग्णालयात जावून मेडिकलमधून बाहेरील नागरिकांना गोळ्या-औषधे मिळत होती. तसेच वायसीएम रुग्णालयातील बाह्य रुग्ण (ओपीडी), अत्यावश्यक (ओपीडी) अडमिट असणा-या रुग्णाच्या नातेवाईकांना देखील मेडिकलमधून सवलतीत औषधे मिळत होती. मात्र, हे मेडिकल बंद असल्याने मागील अठरा महिन्यात रुग्णाच्या नातेवाईकांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु, लवकरच हे मेडिकल रुग्णांच्या सेवेत पुन्हा कार्यरत राहणार असल्याने बाहेरील नागरिकांसह रुग्णालयातील दररोज उपचारास येणा-या दोन ते तीन हजार लोकांना दिलासा मिळणार आहे. न्यायालयाने आदेश देऊनही तत्कालीन माजी पदाधिका-यांनी मेडिकलचा ताबा दिलेला नाही. मेडिकलमधील स्टॉक मोजून द्यायला हवा होता. संगणकावरील माल, जागेवरील माल आणि एक्सपायर झालेला माल अशा सर्वांचे आडिट करणार आहे. ७० ते ८० टक्के औषधांचा माल खराब झाला आहे. महासंघाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. येत्या आठ दिवसात रुग्ण सेवेसाठी मेडिकल सुरू होईल. जेनेरिक औषधांमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना चांगला दिलासा मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button