breaking-newsपिंपरी / चिंचवड

त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ग्रेडसेपरेटर बांधण्याची मागणी

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

शहरासाठी दुवा ठरणा-या त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ग्रेडसेपरेटर तातडीने बांधण्याची मागणी नगरसेवक उत्तम केंदळे आणि नगरसेविका कमल घोलप यांनी केली आहे.

स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौक हा पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग यांना जोडणारा आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसर आणि तळवडे, चाकण आद्योगिक परिसराला जोडणारा आहे. तरी देखील तेथील वाहतूक समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सुरक्षित वाहतूक आणि सुरळित दळणवळणासाठी या त्रिवेणीनगर चौकात ग्रेडसेपरेटर तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी पिंपरी-चिचंवड महानगरपालिकेने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक केदळे व नगरसेविका कमल घोलप यांनी केली आहे. 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून निगडी, प्राधिकरण, मोशी, चिखली, भोसरी यांना जोडणारा स्पाईन रस्ता विकसित केला. त्यापैकी स्पाइन रस्त्याचे त्रिवेणीनगर येथील ३३० मीटर अंतरातील काम रखडलेले होते. संबंधित ठिकाणच्या नागरिकांची घरे बाधित होत असल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आला. या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली व पिंपरी महापालिकेने मागणी केलेली प्राधिकरणाची १४ हजार ७८४ चौरसमीटर जागा चालू निवासी दराने आकारणी करून महापालिकेला थेट वाटप करण्यास मान्यता मिळालेली आहे. संबधित नागरिकांना भुखंड वाटप देखील सुरू असून स्पाईन रस्त्याचा तिढा सुटणार आहे. या बाधित नागरिकांसाठी पुनवर्सन करण्याचा पाठपुरावा आणि भूखंड मिळवून देण्याचे काम भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्यामुळे झाले आहे.

स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौक हे एकप्रकारे जक्शन ठरू लागले आहे. पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग या दोन महामार्गांना जोडणार चौक आहे. त्यासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीला लागून विकसित -झालेल्या चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्कला जाण्यासाठी नागरिकांना, तसेच दोन्हीकडील कारखानदारांसाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण आहे. या चौकातून असंख्य माल वाहतूक करणा-या वाहनांची वर्दळ असते. यामुळे या रस्त्यावरून रोजच प्रवास करणा-या नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ मंडळींना त्रास सहन करावा लागतो. तसेच, वारंवार अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरवासीयांची गरज लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या ठिकाणी ग्रेडसेपरेटर बांधण्याचे नियोजन करावे. तशा सूचना संबधित अधिका-यांना द्यावात. तसेच, याची तातडीने अंमलबजावणी करून सुरक्षित व सुरळित वाहतूक सुरू करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच, या वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या कामासाठी तरतूद करावी, असे केदळे व घोलप यांनी दिलेल्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button