breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांना अर्थसंकल्पात कर सवलत द्या, युवक काँग्रेसची महसूल मंत्र्यांकडे मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना  रोजगार वाढीला प्रोत्साहन मिळण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांना विशेष कर सवलत देण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी युवक कॉंग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, देशातील वाढती बेरोजगारी हा सर्वात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, गेली 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी असल्याच राष्ट्रीय सांख्यिकी आयोग आणि सीएमआयई संघटना सांगत आहे. देशातील बेरोजगारीचे आव्हान प्रचंड असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर  राज्य आहे. वाहन, कापड, बांधकाम तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. पिंपरी चिंचवड हे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते. जगातील वाहन क्षेत्रातील सर्व मोठे कारखाने पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडी औद्योगिक क्षेत्रात आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग सरकारच्या काळामध्ये ज्या प्रमाणात औद्योगिक प्रगती झाली त्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील झाली. परंतु 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नोटबंदी , जीएसटी सारखे अविचारी निर्णय व ढासळती अर्थव्यवस्था या सर्व कारणांमुळे देशात व राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, सारख्या योजना पूर्णपणे फसल्या व त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे.

परंतु, या परिस्थितीत देखील अनेक उद्योगधंदे आपले अस्तित्व टिकवून आहेत व अनेकांना रोजागर उपलब्ध करून देत आहेत. या उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच रोजगार वाढी साठी अर्थसंकल्पात विशेष कर सवलत देण्याची तरतूद करावी. जेणे करून औद्योगिक प्रगती होईल रोजगार निर्माण होईल. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनावर उपस्थित सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव व  पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे, कुंदन कसबे, गौरव चौधरी,  विशाल कसबे, तुषार पाटील, वसीम शेख, अनिकेत आरकडे, रोहित शेळके यांच्या स्वाक्षरी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button