breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष कै. अण्णासाहेब मगर यांचे “जन्मशताब्दी वर्ष” घोषित करा

  • माजी नगरसेवक अरुण बो-हाडे यांची महापालिकेकडे मागणी
  • महापौर, आयुक्त आणि विरोधी पक्षनेत्यांना दिले पत्र

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार व पहिले नगराध्यक्ष दिवंगत खासदार अण्णासाहेब मगर यांची शंभरावी जयंती येत्या १९ एप्रिल रोजी आहे. या शहरासाठीचे त्यांचे योगदान व महत्त्व अनन्यसाधारण आहे. या लोकनेत्याविषयी कृतज्ञता म्हणून महापालिकेने  दि. १९ एप्रिल ते १९ एप्रिल २०२० पर्यंत “अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी वर्ष” म्हणून घोषित करावे. त्याअनुषंगिक विविध कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी केली आहे.

महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बो-हाडे यांनी मागणीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दिवंगत खासदार मार्तंड धोंडीबा तथा अण्णासाहेब मगर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते होते. १९५२ पासून त्यांनी तत्कालीन हवेली विधानसभेचे अनेक वर्षे नेतृत्व केले. त्याकाळी पिंपरी-चिंचवड परिसर हवेली विधानसभा क्षेत्रात समाविष्ट होता.

त्यांच्याच प्रयत्नांनी १९७० मध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी या ग्रामपंचायती विलीन करून “पिंपरी चिंचवड नगरपालिका” अस्तित्वात आली. त्यावेळी आमदार असलेल्या अण्णासाहेब मगर यांची शासनाने नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. या शहरातील पायाभूत सुधारणा आणि मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले.

औद्योगिकीकरण आणि व्यापारउद्दीम याला चालना देऊन त्यांनी नगरपालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढविले, त्यामुळेच “श्रीमंत नगरपालिका” अशी शहराची संपूर्ण देशात सर्वदूर ओळख निर्माण झाली. देशात नावारुपाला आलेली आपली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका त्याच भक्कम पायावर आज उभी आहे. कै. अण्णासाहेब मगर यांचे उपकार लक्षात घेऊन महापालिकेने वरील उपक्रम राबविले तर कृतज्ञता व्यक्त होईल. दि. १९ एप्रिल ते १९ एप्रिल २०२० पर्यंत “अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी वर्ष” म्हणून घोषित करावे. त्याअनुषंगिक विविध कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button