breaking-newsराष्ट्रिय

चांद्रयान-२ नंतर इस्त्रोचं पहिलं मिशन, १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावलं ‘कार्टोसॅट-३’

इस्त्रोने इतिहास रचला असून १६२५ किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं. ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहासह अमेरिकेतील १३ व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आलं. पृथ्वीची छायाचित्रं काढण्यासाठी, तसंच नकाश निर्मितीसाठी ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.

१३ लघु उपग्रहांमध्ये ‘फ्लोक-४ पी’ हे १२ लघु उपग्रह असून, एक ‘एमईएसएचबीईडी’ हा लघु उपग्रह आहे. ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह अवकाशात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. कार्टोसॅट-३ उपग्रहामध्ये हाय रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे.

या खास क्षणी इस्त्रोचे प्रमुख के सिवन यावेळी श्रीहरीकोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित होते. ‘कार्टोसॅट-३’ भारताचा डोळा असल्याचं सांगितलं जात आहे. कारण याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मॅपिंग करणं शक्य होणार आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे.

MAHA INFO CENTRE✔@micnewdelhi

.@isro launches PSLV-C47 carrying #Cartosat3 and 13 nano satellites from Satish Dhawan Space Centre, Sriharikota.

Congratulations #ISRO१५१०:३१ म.पू. – २७ नोव्हें, २०१९ · New Delhi, IndiaTwitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयताMAHA INFO CENTRE यांची इतर ट्विट्स पहा

‘कार्टोसॅट-३’हा प्रगत उपग्रह असून त्याच्या मदतीने अधिक सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतील. ५०९ किमीच्या कक्षेत तो पाठवण्यात येणार असून पीएसएलव्ही सी ४७ प्रक्षेपकाचे हे २१ वे उड्डाण आहे. पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात सहा घन इंधन मोटारी आहेत. पीएसएलव्ही सी ४७ आणखी १३ व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन झेपावले आहेत. ते सर्व अमेरिकेचे आहेत. श्रीहरिकोटा येथून होणारे हे ७४ वे उड्डाण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button